युवा संकल्प संस्था विदर्भ (महाराष्ट्र राज्य) द्वारा आयोजितOnline सामान्य ज्ञान परिक्षेचा निकाल घोषित

0
567

युवा संकल्प संस्था विदर्भ (महाराष्ट्र राज्य) द्वारा आयोजितOnline सामान्य ज्ञान परिक्षेचा निकाल घोषित

यशस्वी परीक्षार्थींना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन केला गौरव

 

प्रतिनिधी✍🏻सुखसागर झाडे

गडचिरोली :- कोरोना(covid 19 ) या महामारीवर प्रतिबंधक उपाय म्हणून सुरु असलेल्या lockdown मुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या ज्या विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले अश्या गरीब व होतकरू ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी त्यांच्या ज्ञानात भर पढावा व विद्यार्थांची मनस्थिती शिक्षणात राहावी, म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम युवा संकल्प संस्था गडचिरोली जिल्हा यांच्या माध्यमातुन ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

सदर परिक्षेला 956 विद्यार्थी सहभागी झाले होते .त्यापैकी 832 विद्यार्थ्यांनी सामान्य-ज्ञान परीक्षेचा पेपर दिला. प्रोत्साहनपर म्हणून तीन बक्षीस ठेवण्यात आले होते या परीक्षेत स्नेहा दिगांबर लाटेलवार

राःब्रम्हपुरी, ताःब्रम्हपुरी,जिःचंद्रपूर

हिने प्रथम क्रमांक पटकाविला . तर

वैभव शंकर कुच्चलवार

राःगोडपिपरी, ताःगोडपिपरी,जिः चंद्रपूर याने द्वितीय क्रमांक पटकाविला

नथू भिवसंग गेडाम

राःजैरामपुर, ताःचामोशी, जिःगडचिरोली याने तृतीय क्रमांक पटकावला यावेळी यु . सं स . संस्थापक / अध्यक्ष मा. राहुलजी वैरागडे, उपाध्यक्ष चेतन कोकावार, प्रशांत पालपल्लीवार, सचिन वानखेडे,यु सं. चामोशी प्रमुख सुरज नैताम, उपप्रमुख प्रशांत चुधरी, देवा तुंबडे, राहुल भांडेकर, विशाल बंडावार, प्रशांत कुसराम, राहुल मडावी, अक्षय गुरुनुले व युवा संकल्प संस्थेचे समस्त कार्यकर्ते सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here