स्व. राजकमलजी भारती यांच्या पुण्यतिथी निमीत्त गरजूंना अन्नदान

0
584

स्व. राजकमलजी भारती यांच्या पुण्यतिथी निमीत्त गरजूंना अन्नदान

समीर मलनस । आर्णी येथील श्री दत्त प्रासदिक शिक्षण प्रसारक मंडळाचे शिल्पकार स्व. राजकमलजी भारती यांचा श्री. म. द. भारती विद्यालय मुख्य शाखा, आर्णी येथे पुण्यतिथि चा कर्यक्रम आयोजीत करण्यात आला. स्व. राजकमलजी भारती यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची महती अखंड सुरु रहावी यासाठी संस्थेच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व मास्कचे वाटप तसेच अरुणावती नदीच्या काठावर राहणारे स्थलांतरीत गरजू लोकांना फळे व मास्क वाटप केले अश्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री दत्त प्रासदिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. संजयजी भारती, उपाध्यक्षा मा. डॉ. किरणताई भारती, कोषाध्यक्ष मा. प्रियदर्शनजी भारती, सचिव अॅव्होकेट सिद्धार्थजी भारती, मा. अश्विनीताई भारती, मा. नुतनताई भारती व मा. समृध्द भारती व तसेच श्री. म. द. भारती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचर्य ए. डी. जगताप, उपमुख्याध्यापक दिलीप नन्नावरे, पर्यवेक्षक के. एन. मस्के, पर्यवेक्षक प्रफुल वानखडे, प्रा. निशिकांत खडसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here