महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी एकमताने गठित !

0
266

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी एकमताने गठित !
शंकर बोरघरे यांची अध्यक्षपदी नियूक्ती !
🟡🌼🔵भद्रावती🟪🟩🟦🟧🟣किरण घाटे🟡🌼
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेची सन २०२१ करीता नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी शंकर बोरघरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
🌼🟡🟣 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेचे ज्येष्ठ सदस्य अशोक पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वार्षिक सभेत शंकर बोरघरे यांची एकमताने निवड करण्यात आली.तर कार्याध्यक्ष म्हणून अशोक पोतदार,उपाध्यक्ष सुनील पतरंगे,सरचिटणीस अब्बास अजानी, संघटक जावेद शेख, प्रसिध्दी प्रमुख शाम चटपल्लीवार, मार्गदर्शक रुपचंद धारणे‌, सदस्य ईश्वर शर्मा, सुनील बिपटे, वतन लोणे, सुनील दैदावार, प्रदीप मडावी, पवन शिवनकर, महेश निमसटकर, नंदकिशोर पचारे, दीपक आसुटकर, जितेंद्र माहुरे यांची निवड करण्यात आली. 🟣💠🟪ही कार्यकारिणी एक वर्षाकरीता गठीत करण्यात आली.
🟡🟩🟦🟣 यावेळी सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच दि.६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
🟡🟣🟦 सभेचे संचालन रुपचंद धारणे यांनी केले,तर वतन लोणे यांनी आभार मानले.सभेत नूतन अध्यक्षांचे सर्वांनी अभिनंदन केले.व शुभकामना दिल्या ! सभेला अनेक पत्रकार बांधव उपस्थित हाेते

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here