मान्सून पूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांची गतीने पूर्तता करा – आ.सौ.सुलभा खोडके

0
434

देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे गाडगेनगरवासियांना अखंडित वीज पुरवठा लाभणार

 

भूमिगत वाहिन्यांच्या चाचपणीसाठी आमदारांची महावितरणला सूचना

 

 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी( ✍🏻 देवेंद्र भोंडे ) अमरावती :- अमरावती महानगर अंतर्गत प्रभाग क्रमांक ०२ स्थित संत गाडगेबाबा-पीडीएमसी प्रभागातील गाडगेनगर सहित विविध भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अवकाळी तसेच वादळी पावसामुळे महावितरणसह वीज ग्राहकांना विद्युत लपंडावाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. या दरम्यान विद्युत तारांना स्पर्श झालेल्या व झाडांच्या फांद्या कापण्याचे काम पूर्ण करण्यात येत होते. त्यासाठी जवळपास सर्व भागातील विद्युत पुरवठा रोजच महावितरणकडून बंद केल्या जात होता. जेणेकरून दुरुस्तीचे काम व विद्युत पुरवठ्यास कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता कंपनीच्या वतीने मान्सून पूर्व कामांची पूर्तता सुद्धा केल्या जात आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेकवेळा झाडे अथवा झाडाच्या फांद्या कोसळल्यामूळे विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत . हि बाब लक्षात घेता बुधवार दिनांक ०९ जून रोजी आमदार सौ. सुलभा संजय खोडके यांनी गाडगेनगर भागात विद्युत पुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या सुरु असलेल्या कामाच्या स्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या दरम्यान आमदार महोदयांच्या वतीने स्थानीय नागरिकांच्या समस्या सुद्धा जाणून घेण्यात आल्यात. यावेळी स्थानीय परिसरातील उपरी मार्ग असलेल्या विद्युत वाहिन्यांना भूमिगत केबल करता येईल का, याची चाचपणी करण्याच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने महावितरणच्या अभियंत्यांना सूचना करण्यात आल्या. यासोबतच मान्सून पूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांची तातडीने पूर्तता करण्यात यावी. असे सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने संबंधितांना सांगण्यात आले. जेणेकरून स्थानिकांना सुरळीत विद्युत पुरवठा उपलब्ध होईल. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता मान्सून पूर्व काळात झाडांचे व फांद्यांचे सर्वेक्षण करण्यासह विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या तारा आदी बाबी लक्षात घेता हि कामे सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी, अशा सुद्धा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. विद्युत वाहिनीच्या आवश्यक दुरुस्तीची कामे दिनांक १४ व १५ जून ला पूर्ण करून त्या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, हि बाब यावेळी महावितरण अभियंत्यांच्या वतीने आमदार महोदयांच्या समक्ष स्पष्ट करण्यात आली. आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने नागरी समस्यांची तात्काळ दखल घेण्यात आल्याने, आता पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्ती ची कामे गतीने होणार असल्याने तसेच अन्य उपाययोजनांना घेऊन महावितरणच्या वतीने खबरदारी बाळगली जात असल्यामुळे आता प्रभाग क्रमांक ०२ संत गाडगेबाबा-पीडीएमसी प्रभागातील नागरिकांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांच्या समस्यांची आमदार महोदयांच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आल्याने आता सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध होत असल्याबद्दल नागरिकांच्या वतीने यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता शहर आनंद काटकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, सहायक अभियंता परेश कनाटे, यश खोडके, महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ अनुप धर्माळे, गाडगेनगर विद्युत तक्रार निवारण केंद्र स्थित कार्यालयीन सहायक निलेश केंदळे, आऊट सोर्सिंग कामगार अक्ष बावणे, अजय भेले, प्रमोद महल्ले, नगरसेवक चंद्रकांत बोमरे, सुरेश चौधरी, राजेश वानखडे, कुणाल वाट, संदीप देशमुख, प्रभाकरराव फुसे, सुरेश भक्ते, संदीप राऊत आदींसहित स्थानीय नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here