चंद्रपूरच्या विविध भागात यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण , अजय दुर्गेसह अनेक युवा कार्यकर्त्यांचा सहभाग !

0
1209

चंद्रपूर विदर्भ /किरण घाटे – विदर्भात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने काल शनिवार दि.५ जूनला “जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम” पार पडला.

 

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष विद्यमान आमदार तथा यंग ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग विद्यार्थी आघाडी ब्रिगेडचे प्रमुख अजय दुर्गे यांचे नेतृत्वात चंद्रपूर शहरातील विविध भागात सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यांत आला .दर वर्षि या संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यांत येताे .काल पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक सामाजिक युवा कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नाेंदविला .या कार्यक्रमातुन दुर्गे यांनी वृक्षरोपणाचे महत्त्व पटवुन देत वृक्ष संवर्धन करण्याच्या सुचना या वेळी उपस्थित कार्यकर्त्याना दिल्या .

 

वृक्षारोपण कार्यक्रमाला कुणाल उराडे, समीक्षा आसेकर, ममता पानेमवार स्वप्निल तेलसे,हर्षित रामटेके,.निखिल कटोले,सचिन महोरकर,चंद्रशेखर चिताडे ,अँजेश जिल्लरवार, तुषार व्हेलेकर, संजना मडकाम , मृणालिनी खरतड,जानव्ही चांदेकर , प्रिया लदवे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here