वरूर रोड येथे अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार

0
1351

वरूर रोड येथे अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार

राजुरा, अमोल राऊत : राजुरा कडून येत असताना गायीला दुचाकीने (एम एच ३४ ए जी ७२५९) दिलेल्या धडकेत इसम जागीच ठार झाल्याची घटना आज संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास वरूर रोड येथे घडली. या धडकेत ठार झालेल्या इसमाचे नाव प्रकाश कोंडुजी वाटघुरे (वय ३५ वर्ष) असून तो सोमनाथपुर येथील रहिवासी आहे.
सदर इसम साईकृपा ट्रान्सपोर्ट येथे काम करत असल्याची प्राथमिक माहिती असून सासुरवाडी सोनूर्ली येथे जात होता. सदर इसमाला दोन मुले आहेत. वृत्त लिहिस्तोवर पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here