महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

0
9

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

 

घुग्घुस :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबंई, शाखा घुग्घूस तर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन ५ जून ला करण्यात आले होते.मात्र वृक्ष वेळेवर न आल्यामुळे आज दिनांक ८ जून रविवार सकाळ रोजी वड, कडूनिंब, चिंच, अशोका अशा विविध प्रकारच्या देशी झाडाचे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपणाचा महत्व आहे कारण वृक्ष वायु प्रदूषण कमी करतात, वातावरणाला सुंदरता देतात आणि जलवायू नियंत्रित करतात. वृक्षारोपणाच्या कार्यातून समाजाला लाभ होतो, जसे की शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुधारणा.
झाडे लावून झाडे जगवा हे हमार्यांसाठी एक महत्वाचं काम आहे आणि त्याच्या संरक्षणातून समुदायाला सुविधा होते. आपल्या समाजात वृक्षारोपणाच्या महत्वाच्या अभिप्रायांचा समर्थन करणं आवश्यक आहे आणि त्याच्या लाभाच्या बाबत सज्ज राहावं लागेल.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुग्घूसचे अध्यक्ष सुरेश खडसे, कार्याध्यक्ष संजय पडवेकर,सचिव इम्तियाज शेख,सोशल मीडिया तालुका अध्यक्ष साहिल सैयद,संघटक पंकज रामटेके, दशरथ आसपवार,संदिप चांभारे व देवानंद ठाकरे उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध प्रकारच्या देशी झाडांची रोपे लावण्यात आली.तसेच नागरिकांनीही आपापल्या परिसरात वृक्ष लावावी यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांनी काही झाडें नागरिकांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here