कोरोना काळातही भारतीय शिक्षण व्यवस्था सुरक्षित- अभिजीत सुभाष धोटे

0
562

कोरोना काळातही भारतीय शिक्षण व्यवस्था सुरक्षित-
अभिजीत सुभाष धोटे

🟡🟨चंद्रपुर 🟩🟣💠🟧किरण घाटे🟪🟩🟥 जगातील सर्वोत्तम संविधान भारतीय संविधान आहे. संविधानाने आपल्याला महत्त्वपूर्ण अधिकार आणि कर्तव्य प्रदान केले आहेत. त्यामुळेच कोरोनाच्या संकटातही भारतीय शिक्षण व्यवस्था, सामाजिक एकता, धर्मनिरपेक्षता सुरक्षित राहीली आहे. याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाच्या सर्वोच्च भावनेने काम करून जीवन ध्येय गाठावे असे आवाहन राजुरा इन्फँट जिसस सोसायटीचे संचालक अभिजित सुभाष धोटे यांनी इन्फंट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी केले.
💠🟥🟨🟪या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट जिजस ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समिर पठाण, कल्याण नर्सिंग काँलेजचे प्राचार्य पुजा गीते, इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराचे मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, रफिक अंसारी, प्रा देवानंद चुनारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
💠🟨🟥🟪 सकाळी ठिक ७ वाजुन ५० मिनिटांनी संचालक अभिजित सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाला संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना मिठाई वाटप करण्यांत आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here