गोयेगाव वासियांनी पुन्हा एकदा थांबवल्या ग्रिल च्या ट्रक
दि. 7 जानेवारी 2024
गोयेगावं ते खामोणा PWD रोड वर ग्रिल कंपनी च्या अवैद्य दिवस रात्र भरलेल्या ट्रक चालत असल्या मूळे स्थानिक वासियांना खूप त्रास होत आहे. गोयेगाव-खमोना PWD रोड ट्रक नेण्याची परवानगी नाही तरी सुद्धा ग्रिल कंपनी च्या ट्रकची जोमाने वाहतूक चालू आहे. त्यामुळे शेतकरी व स्थानिकांना त्याचा खूप त्रास होत आहे.
या संदर्भात ग्रिल च्या सुपरवाईजर सोबत 8 दिवसाआगोदर चर्चा केल्यास पुन्हा या रस्त्यावरून ट्रक जाणार नाही असे त्यांनी सांगितले. पण पुन्हा ट्रक सुरू झाल्यामुळे स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गावकऱ्यांनी पूनच्छा एकदा सुपरवाईजर सोबत फोन वर बोलून त्यांना समस्या सांगण्यात आल्या. या नंतर पुन्हा या रस्त्यावरून ट्रक गेल्यास होणाऱ्या नुकसानास ग्रिल कंपनी स्वतः जबाबदार राहील असे सुपरवाईजर यांनी सांगितले.
सदर अंदोलनात अनवेश उईके, स्नेहल पडवेकर, धनराज सातपुते, मारोती चने, नूतन पायपरे, राजकिरण पिपरे, अक्षय विधाते, सुभाष वाढई, महेश धुर्वे व गावकऱ्यांनी काही वेळ ट्रक अडवून धरल्या.