सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आंतरजातीय युवक-युवतीचा विवाह संपन्न
चंद्रपूर : येथील शतपावली ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून एका आंतरजातीय जोडप्याचा विवाह औद्योगिक वसाहतीच्या प्रांगणात काल २० ऑक्टोंबर २०२० ला पार पडला.
बंगाली कॅम्प येथील अजय नर्तालेमूड आणि शिल्पा मंडल यांचा विवाह संस्थेच्या पुढाकारातून लावून देण्यात आला. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राकेश पूल्लावार, उपाध्यक्ष काजल लाकडे, संस्थेचे सचिव कोमल जांभूळकर, नरेश खांडरे, दिनेश कंदिकुरवार, डॉ. मिलिंद जांभूळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अबिकेश नळे, संदीप खोब्रागडे, लक्ष्मीकांत कैकर्यावार हे ही उपस्थित होते.