तलाठी अडकला एसीबी च्या जाळ्यात…

0
2882

तलाठी अडकला एसीबी च्या जाळ्यात…

 

राजुरा, 19 जुलै : तालुक्यातील वरूर रोड येथील तलाठी एसीबी च्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई आज केली असून तलाठी विनोद गेडाम यांवर गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आले आहे.

तक्रारदाराकडून तडजोडी अंती लाचेची रक्कमेचा दुसरा हप्ता रुपये 25 हजार लाचेची मागणी तलाठ्याने केली होती. तक्रारदाराने तोंडी फिर्याद दिल्यानंतर सदर कारवाई आज करण्यात आली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील अर्थकारण करणाऱ्यांत चांगलीच धडकी भरली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरचे पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे, नापोशी नरेशकुमार ननावरे, पोशी रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, संदेश वाघमारे, मेघा मोहूर्ले या पथकाने सदरची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here