सरकार मान्यताप्राप्त “पत्रकार संरक्षण समिती “च्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी रूपेश निमसरकार यांची निवड…!

0
428

सरकार मान्यताप्राप्त “पत्रकार संरक्षण समिती “च्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी रूपेश निमसरकार यांची निवड…!

 

 

चंद्रपूर : न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समिती च्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


चंद्रपुर जिल्ह्यातून ग्रामीण भागातून अंत्यत हलाखीची परिस्थिती असतांना सुद्धा वृत्तपत्रातून अनेक मुद्याला वाचा फोडत सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रुपेश निमसरकार हे ग्रामीण प्रतिनिधि ते जिल्हा प्रतिनिधि पासून आता दैनिक सुवर्ण महाराष्ट्र वृत्तपत्राचे नागपुर आवृती संपादक पर्यतंचा यशस्वी पल्ला गाठला आहे.

त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्राने घेतली असून चंद्रपुर जिल्हातील धडाकेबाज पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता रूपेश अशोकराव ‌निमसपकार यांच्यावर पुन्हा एक जबादारी देत पत्रकार संरक्षण समीती चे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे , राज्य सचिव अनिल चौधरी पुणे, तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक या सर्वांनी केली असुन ‌संस्थापक अध्यक्ष विनोद पञे यांनी नियुक्ती पञ दिले आहे. तसेच रूपेश निमसरकार हे एक निर्भीड पत्रकार असुन समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, ते चंद्रपुर जिल्हातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील अशा आशा व्यक्त करीत पत्रकार क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here