भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून घेतला आढावा

0
446

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून घेतला आढावा

अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा

 

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अप्पर वर्धा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. परंतू याचा गंभीर फटका चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या लगतच्या अनेक गावांना बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जिल्ह्यामध्ये वरोरा तालुक्यातील पोहा, अर्जुनी, सोईट, करंजी, मारडा, एकोणा, बेंबा व चरूळखटी भद्रावती तालुक्यातील पळसगाव, मणगाव, कोच्ची, घोणाड, कोंढा, चारगाव, पारोधी, पिपरी, माजरी, पाटाळा तर चंद्रपूर तालुक्यातील बेलसणी व घुग्घुस या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत होऊन अनोनात नुकसान झाले आहे. पळसगाव, सोईट व बेलसणी येथे पुराचे पाणी प्रचंड वाढल्याने नागरिकांना बोटीने रेस्क्यू करावे लागत आहे.

या संपूर्ण पूरपरिस्थितीवर राज्याचे माजी अर्थमंत्री तथा माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सातत्याने लक्ष ठेवून आहेत. ज्या भागात पूर कायम आहे अशा ठिकाणी प्रशासनाने सर्वतोपरीने मदत करावी, नागरीकांना आरोग्यविषयक सोयी पुरवाव्या, आणि नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावे असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आज दि.१९ जुलै २०२२ मंगळवार रोजी या पुरग्रस्त गावांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरपीडीतांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जि. प. सदस्य रंजित सोयाम, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गोंड यांचेसह आदि मंडळी सोबत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here