तलाठी कार्यालयाच्या दर्शन भागात नागरिकांची सदन व कार्यालयीन वेळेत हजर न राहणाऱ्या तलाठ्याना समज द्या…!

0
415

तलाठी कार्यालयाच्या दर्शन भागात नागरिकांची सदन व कार्यालयीन वेळेत हजर न राहणाऱ्या तलाठ्याना समज द्या…!

सिंधूताई राठोड यांनी तहसीलदाराकडे केली कारवाईची मागणी

 

 

जिवती : अतिदुर्गम व मागास असलेल्या जिवती तालुक्यातील तलाठी साजा मध्ये तलाठी हजर राहत नसल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.
तलाठी दादा साजामध्ये नाहीत म्हणून नागरिक तहसील कार्यालयात येऊन तलाठी दादाला शोधतात तरीही तलाठी नागरिकांना भेटत नाही.
एकाच कामासाठी नागरिकांना चार ते पाच चकर माराव्या लागतात तरीही कामं होईल याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही.
तलाठी कार्यालयातुन देण्यात येणारे विविध प्रकारचे कागदपत्रे नागरिकांना काही कामानिमित्त आवश्यकता लागत असून तलाठी हजर राहत नाही.
जिवती तालुक्याचे तहसीलदार मा. चिडे साहेब आपल्या स्थरावरून वेळीच कारवाही न केल्यास येत्या 8 दिवसात खुर्चीला हार घालून गांधीगीरी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई राठोड यांनी निवेदनद्वारे दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here