‘ऍड ऑन्स फॉर फॅशन डिझायनर्स’ विषयावर सेमिनार संपन्न

0
889

‘ऍड ऑन्स फॉर फॅशन डिझायनर्स’ विषयावर सेमिनार संपन्न

 

 

चंद्रपूर: शहरातील सरदार पटेल महाविद्यालच्या सभागृहात महाविद्यालयातील फॅशन डिझाईन विभाग आणि डिझविझ प्रोडक्शन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० एप्रिल २०२२ रोजी “ऍड ऑन्स फॉर फॅशन डिझायनर्स” या विषयावरील सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

आयोजित सेमिनार कार्यक्रमात डिझविझ प्रोडक्शन नागपूरचे संस्थापक संचालक अभिषेक आचार्य यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सध्यस्थितीत फॅशन डिझाईन क्षेत्रात डिजिटलायझेशन कश्या पद्धतीने होत आहे, या क्षेत्रात स्वतःचे वेगेळे अस्थित्व निर्माण करणे गरजेचे आहे व त्याकरिता काळाच्या पुढे राहणे हीच गरज बनलेली आहे. त्याकरिता जगात कुठला ट्रेंड सुरु आहे व त्याकरिता कुठले तंत्रज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे. याबद्दल अतिशय समर्पक असे मार्गदर्शन त्यांनी केले.

 

फॅशन डिझाइनर कागदावर न राहता २ डी तसेच ३ डी सॉफ्टवेअर वापरून जागतिक दर्जाचे डिझाईन कसे तयार करता येईल हे त्यांनी उदाहरणासहित विद्यार्थ्यांना या सेमिनारमध्ये प्रात्यक्षिक करून दाखविले. जवळपास १.३ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेले हे क्षेत्र लोकल ते ग्लोबल सर्वांसाठी खुले असल्याचे मत आचार्य यांनी मांडले.  चंद्रपुरातील विद्यार्थी यात कुठेही मागे पडू नये यासाठी पुढील शैक्षणिक क्षेत्रात आपण या विषयावर कार्यशाळा घेत राहू असे आग्रहाने सांगितले.

 

याप्रसंगी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एम कातकर यांनी वेगवेगळ्या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन संसाधन महाविद्यालयाकडून नेहमीच पुरविल्या जाणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी महाविद्यालयातील सर्वात जास्त रोजगार आणि व्यवसाय निर्माण करणारी विद्याशाखा म्हणून फॅशन डिझाईन शाखेचे कौतुक केले. सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये जवळपास ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सेमिनारकरीता फॅशन डिझाईन विभाग प्रमुख अनिता मत्ते, प्रमोद गंगाधर, अपर्णा तेलंग, लीना ठाकरे तसेच अश्विनी रागीट यांनी विशेष सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here