राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विसापूर, चुनाभट्टी येथे भीमशक्ती तर्फे स्थानिक विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
विसापूर: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विसापूर, चुनाभट्टी प्रभाग क्र.6 येथे स्थानिक विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण” दिनानिमित्त आयोजित ‘एक वहि एक पेन’ या कार्यक्रमातून उपलब्ध झालेले शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा,चुनाभट्टी मुख्याध्यापिका मंजुषा मडावी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सरोज केतकी सोबतच भीमशक्ती युवा ग्रुपचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वप्निल सोनटक्के, सचिन पुणेकर, गुंजन वानखेडे, सिद्धांत पुणेकर, आशिष तितरे, प्रथम दुपारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.