विवाहितेची आत्महत्या…

0
591

विवाहितेची आत्महत्या…

 

चिमूर, आशिष गजभिये : तालुक्यातील शंकरपूर येथील वॉर्ड नंबर ३ मध्ये रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या राहते घरी आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. जानू बादल मंडल वय २२ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून दीड वर्षाआधी बादल बाबूलकुमार मंडल याच्याशी विवाह झाला होता.

नवरात्री चा पहिला दिवस असल्याने घरी घटस्थापनाची तयारी सुरू होती. याच वेळेस या महिलेने घरातीलच स्वयंपाक रूम मधील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्या लोकांना माहिती होताच त्यांनी तिला उतरवून शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्याचे कारण अजून पर्यंत कळले नसून घटनेचा अधिक तपास शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here