लातूर मधील वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आंटीची दामिनी पथकाने वाजवली घंटी, तिघेजण ताब्यात.
लातूर जिल्हा प्रतिनिधी: बाबूराव बोरोळे }
विरहणमंतवाडी परिसरातील एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथक यांना मिळाल्यावरून त्यांनी ही माहीती वरिष्ठांपर्यंत पोहचवून अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक पोलीसांनी टाकलेल्या धाडीत एका पीडित महिलेची सुटका करून चालक असलेली आंटी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कविता अविनाश शिंदे रा. विरहणमंतवाडी , ज्ञानेश्वर आंधळे वय ३५ व श्रीमंत मानाजी तांदळे वय ३० दोघंही राहणार अहमदपुर यांच्यावर पिटा कायद्याखाली अटक केली आहे. त्याच्याविरूध्द गांधी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार अधिनियम १९५६ कलम ३,४,५ ,७, आणि भादवि ३७०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या कारवाई मध्ये पोलीस निरीक्षक गित्ते मॅडम , पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक वर्षाराणी आजले , म.पो.शी.सोनाली ढगे, म.पो.ना.साखरे, पो.शी. जोगदंड यांनी सहभाग घेतला.