महावीकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आजपासून आंदोलनास सुरुवात

0
468

महावीकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आजपासून आंदोलनास सुरुवात

आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा पुढाकार, आंदोलनात कोरोना नियमांचे व शासन निर्णयाचे पालन होणार

दिनांक २६ मे पासून पीडित शेतकरी आपल्या घरी, आपल्या गावी तसेच धान्य खरेदी केंद्रावर आपल्या मागण्यांचे बॅनर व फलक घेऊन शांतता मार्गाने आंदोलन करणार

सुखसागर झाडे:- गडचिरोली जिल्ह्यातील धान व मका उत्पादक शेतकरी बांधवांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात दिनांक 25 मे म्हणजे आजपासून आंदोलन करण्यात येत असून आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आमदार डॉक्टर देवरावजी होळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली व धानोरा येथील तहसीलदार व माननीय जिल्हाधिकारी यांना शेतकरी बांधवांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने ज्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले त्यांना रक्कम व बोनस दिलेलं नाही. काही शेतकऱ्यांचे धान घेऊनही सातबारा ऑनलाइन करण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांकडून केवळ धान जमा केले परंतु त्यांना अजूनपर्यंत त्याचा परतावा दिला नाही. गेल्या वर्षीचे सेवा सहकारी संस्थांचे धान खरेदीचे कमिशन अजून पर्यंत दिले नाही. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उघड्यावरील धान्य खराब होते. अजूनही रब्बी हंगामातील धान व मका खरेदी करण्यात आलेला नाही. उन्हाळी धान पिकवणारे शेतकरी अजूनही आपला धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.अशा पिडित शेतकऱ्यांच्या असंख्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची सुरुवात चामोर्शी येथून करण्यात आली आहे.
त्यानंतर दिनांक २६ मे पासून ज्या-ज्या गावातील शेतकऱ्यांचे पैसे व बोनस शासनाने दिले नाही, गावातील शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाईन करण्यात आलेले नाही, ज्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आले परंतु त्यांचा परतावा अजून पर्यंत दिलेला नाही अशा पीडित शेतकऱ्यांच्या गावी त्यांच्या घरी, धान खरेदी केंद्रावर पिडित शेतकरी महविकास आघाडी सरकार चा निषेध करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिली.
आज चामोर्शी येथे मुख्य चौकात आयोजित आंदोलनात भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आशिष पिपरे भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री ,ज्येष्ठ नेते जयराम सावकार चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here