मेक इन गडचिरोली आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारणार

0
474

मेक इन गडचिरोली आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारणार

आमदार डॉ देवराव जी होळी यांची आदिवासी विकास मंत्री ना. के.सी. पाडवी यांचेशी चर्चा

जिल्ह्याला आत्मनिर्भर करण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन

गडचिरोली जिल्ह्यातील आदीवासी नव तरुणांना उद्योगातून रोजगार उपलब्ध करून देण्याची केली विनंती

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. परंतु त्याचा उपयोग जिल्ह्यातील नवतरुणांना उद्योग व रोजगार निर्मितीत कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे.. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून नवतरुणांना उद्योजक करण्यासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेक इन गडचिरोली च्या वतीने आपण प्रयत्न करणार आपण प्रयत्न करीत असून त्याकरिता आपल्या विभागाने सहकार्य करावे अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांचेकडे केली आहे यावेळी भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा उपस्थित होते.
भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी देशातील सर्वांनी आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी नवतरुणानी आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योगाकडे वळावे असे आवाहन केले आहे. दरवर्षी आदिवासी विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यांत मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येतो परंतु त्याचा कोणताही लाभ नसल्याचे दिसून येते.याकडेही त्यांचे लक्ष वेधले.
त्यामूळे अशा काही निधीचा उपयोग मेक इन गडचिरोली च्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यााठी करावा अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here