दारूच्या अवैध विक्रीला उधाण

0
551

दारूच्या अवैध विक्रीला उधाण

राजुरा,विरेंद्र पुणेकर : तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती.

देशी दारू पासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित वेळेत सर्रास मिळत आहे. या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत. पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे. भर चौकात दारुची होते विक्रीअवैध दारु विक्रीचा प्रकार यात काही दुकानांतून ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांना एका मर्जीतल्या व्यक्तीकडून दुचाकीद्वारे दिवसाढवळ्या व रात्रीला भर चौकातूनच दारूचा पुरवठा केला जातो हे विशेष. असाच प्रकार काढोली बूज गावात अधडून आला आहे चिकन चे दुकान चालक चिकन सोबत देशी दारू देखील विक्री करीत आहे. ह्या मुडे गावातील युवकांना दारूबंदी मुडे लागलेला ठप्प ह्या अवैध दारू विक्री मुडे पुन्हा दारूचा नाद लागला असे दिसून येते. ही दारूविक्री बंद करण्यात यावी अशी मागणी काढोली गावासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here