मूल मध्ये महिला सुरक्षा जनजागरण दिन साजरा!

0
601

मूल मध्ये महिला सुरक्षा जनजागरण दिन साजरा! अनेकांची उपस्थिती ! 🟡🔴मूल (चंद्रपूर) किरण घाटे🟤🟡 🟢🟠राष्ट्रवादी काँग्रेस मूल पक्षातर्फे शनिवारला जागतिक महिला दिना निमित्त महिला सुरक्षा जनजागरण दिन साजरा करण्यात आला. रूपालीताई चाकणकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला) यांच्या आदेशानुसार तथा सुचनेनुसार कार्यक्रम कसा साजरा करायचा याची रितसर महिती व कल्पना त्यांनी दिल्यानंतर बेबीताई उईके (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा जनजागरण दिन मूल मध्ये थाटात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात कर्तबगार, कर्तव्यदक्ष व उत्तुंग भरारी घेणांऱ्या महिला उपस्थित हाेत्या . दरम्यान डॉक्टर पूर्वा अनुज तारे यांनी महिलांना माेलाचे मार्गदर्शन केले .स्त्रियांना आरोग्य विषयक जागरूक कसे असावे असे प्रभावी मार्गदर्शन राजश्री रामटेके यांनी या वेळी केले .पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कसे रोखायचे यावर आपले माेलाचे मार्गदर्शन केले, एँड. चांदनी बाबरे यांनी कायदा आणि सुव्यवस्थता कशी राखावी तसेच त्या बाबतीत कोणते पाऊल उचलावे या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा बेबीताई उईके जिल्हा अध्यक्षा यांनी आपला पक्ष कश्या प्रकारे वाटचाल करीत आहे या विषयी पक्ष्याची ध्येय धोरण समजावून सांगितली . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मूल शहराध्यक्ष अर्चना चावरे यांनी केले सदरहु कार्यक्रमाचे संचालन स्नेहा आकुलवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार वैशाली आकुलवार यांनी मानले .सुमीत समर्थ ,प्रशांत भरटकर ,अशोक मार्गनवार, गुरुदास गिरडकर भास्कर खोब्रागडे व सुपर नेरकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी अथक परिश्रम घेतले .उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी शहराध्यक्षा अर्चना चावरे यांनी केले हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here