118 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू

0
438

जिल्ह्यात मागील 24 तासात 165 कोरोनामुक्त

118 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत 14381 बाधित झाले बरे

उपचार घेत असलेले बाधित 2505

एकूण बाधितांची संख्या 17142

चंद्रपूर, दि. 10 नोव्हेंबर : जिल्ह्यात गत 24 तासात 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 118 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये मुल तालुक्यातील चिखली येथील 55 वर्षीय पुरूष व वरोरा तालुक्यातील आनंदवन परीसर येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 256 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 240, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 118 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 142 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 165 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 381 झाली आहे. सध्या 2 हजार 505 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 27 हजार 542 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 8 हजार 860 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 118 बाधितांमध्ये 68 पुरुष व 50 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 54, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 9, चिमुर तालुक्यातील चार,   मुल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील दोन, कोरपना तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील एक,  नागभीड तालुक्‍यातील चार, वरोरा तालुक्यातील 9 ,भद्रावती तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील दोन,  सिंदेवाही तालुक्यातील पाच, राजुरा तालुक्यातील चार तर गडचिरोली येथील पाच असे एकूण 118 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जयराज नगर, लालपेठ कॉलरी परिसर, इंदिरानगर, निर्माण नगर, रयतवारी, लक्ष्मीनगर, वडगाव, बाबुपेठ, नगीनाबाग, ऊर्जानगर, पद्मापूर, सुभाष नगर, कोसारा, घुगुस, स्नेहनगर, भिवापुर वॉर्ड, द्वारका नगरी, तुकूम, शक्तिनगर, श्रद्धा नगर, एकोरी वार्ड, समाधी वार्ड, विद्यानगर, लालपेठ कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मीबाई वार्ड, गोरक्षण वार्ड, मौलाना आजाद वार्ड, विसापूर, कोठारी, भिवकुंड नगर, शिवाजी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती वार्ड, गौरी टाऊनशिप, बेलमपूर, चुनाभट्टी वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील जानी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्ड, जामणी, आठमुर्डी,शांती नगर, आनंदवन परिसर, जिजामाता वार्ड, बोर्डा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील डिफेन्स चांदा परिसर, विजासन रोड परिसर, ओमकार लेआउट, सुमठाणा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, नाचनभट्टी, मुरमाडी किन्ही भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील विद्यानगर, वलनी, गोवर्धन चौक परिसर, प्रगती नगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील बसस्थानक परिसर, साई नगरी भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील ताडाळा, वार्ड नंबर 14 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर, आवारपूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूर, भागातून बाधित पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here