कोरोना जनजागृती काव्यधारा – १८
कवी – विजय वाटेकर, चंद्रपूर

कविता : आॅक्सिजन
मला चिड नाही वा-याची
उलट आवडतो तो खुप
त्याची मंद झुळूक घालवते
माझा दिवसभराचा शिण
वारा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे
हे सांगितले होते गुरुजीने ईयत्ता चौथीत
आहे ध्यानात पक्के
मी तुम्हाला हे ही सांगू शकतो की
मी आहो एक इमानदार भारतीय नागरिक
जो भरतो टँक्स प्रामाणिकपणे
मी आहो संयमी, करतो दुर्लक्ष
जात धर्मासारख्या चिल्लर गोष्टींकडे
आणि जपतो सगळ्याच चांगल्या भारतीय परंपरा
असे असतानाही दोस्तहो
का नाही मिळत मला
माझ्या हिश्याचा ऑक्सिजन.
कवी : विजय शोभा निळकंठ वाटेकर, चंद्रपूर
संपर्क. ९३७०४२०७५०
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)