काटवली, बामणीत लसीकरण उद्दीष्ट पूर्ती ; एकाच दिवशी २२० लाभार्थ्यांचे लसीकरण

0
640

काटवली, बामणीत लसीकरण उद्दीष्ट पूर्ती ; एकाच दिवशी २२० लाभार्थ्यांचे लसीकरण

राज जुनघरे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :-

बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी पासुन अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या काटवली- बामणी गट ग्रामपंचायत स्तरावर एकाच दिवशी दोनशे च्या वर पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करून उद्दीष्ट पुरती चे ध्येय पुर्ण करण्यात आले.
सदर उपक्रम जिल्हा परिषद शाळेच्या आवारात राबविण्यात आला. यावेळी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती इंदिरा पिपरे, गटविकास अधिकारी धनवडे, सरपंच गिरिधर आत्राम, उपसरपंच विजय डंबारे, सचिव व्हि. एन. भुयार, ग्रा. प. सदस्य माधूरी जेऊरकर, सुरेश पेंन्दोर, संगिता वाघाडे, विलास गुरूनुले, ज्योती आत्राम आदींची उपस्थिती होती. ग्रामपंचायतीला प्रथमच मोठ्या प्रमाणात वैकसिन चा साठा उपलब्ध झाल्यामुळे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गावात दवंडी देऊन, प्रचार-प्रसार करून जनजागृती करण्यात आली. आणि एकाच दिवशी २२० पात्र लाभार्थ्यांना लस टोचून उदिष्ट पुरती पार पाडण्यात आली. तसे पाहता काटवली – बामणी गट ग्रामपंचायत या दोन्ही गावात करोनाच्या पहिल्या लाटे पासुन ते आजतागायत एकही पाझिटीव्ह रूग्ण आढळलेला नाही. यामुळे ही गावे शासनाच्या अभिनंदनास पात्र ठरली आहेत. लसीकरणाची उद्दीष्ट पुरती साठी उमेद महिला बचत गटाच्या महिला, जनसेवा ग्रामीण विकास शिक्षण प्रतिष्ठान चे समन्वयक, ग्रामपंचायत चे कर्मचारी गजानन मडावी, रूपेश लोणारे, आशा वर्कर निशा गडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here