नाट्यमय घडामोडीत अखेर चिमुर पोलिस स्टेशनला मिळाले नविन ठाणेदार

0
501

नाट्यमय घडामोडीत अखेर चिमुर पोलिस स्टेशनला मिळाले नविन ठाणेदार

नवनियुक्त ठाणेदार रविन्द्र शिंदे यानी स्वीकारला पदभार

विकास खोब्रागडे

चिमुर पोलिस स्टेशन मध्ये बदली प्रकरणावरुन झालेल्या नाट्यमय घड़ामोड़ीवर अखेर पडदा पडला असून तत्कालीन पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांचे जागेवर नाशिक येथून आलेले रविन्द्र शिंदे यानी चिमुर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.
चिमुर येथे पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे कार्यरत असताना चंद्रपुर जिल्ह्यातील पोलिस नीरीक्षक व उप पोलिस नीरीक्षकासह अनेक पोलिस कर्मचार्यान्चे बदलयांचे सत्र नुकतेच पोलिस अधिक्षकांनी राबविले. बदली झालेल्या सर्व पोलिस अधिकार्यानसह कर्मचार्याना बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे सांगण्यात आले. सदर आदेशावरुन अनेक अधिकारी व कर्मचारी रुजू झालेत. मात्र चंद्रपुर शहर पोलिस ठान्यातुंन चिमुर पोलिस स्टेशनला बदली झालेले पोलिस नीरीक्षक बहादुरे यानी चिमुर क्रांतिभूमित येण्यास नकार दर्शविला. त्यानी वरिश्ताक़डे विनंती अर्ज करून मुख्यालयताच आर्थिक गुन्हे शाखेत आपली वर्णी लाऊन घेतली. दुसरीकडे चिमुरचे थानेदार स्वप्निल धुळे यांचा कार्यकाल संपन्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने त्यानाच येथे कायम ठेवावे असि मागणी नागरिकांकडून केली जात होती.
पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे यांचे बदलिने व थानेदार बहादूरे यांच्या नकार घंटे मुळे 6 दिवसाचा कालावधि होऊन सुधा चिमुर मधे कॉंनतेच पोलिस अधिकारी आले नाही. अस्यात् च दिनांक 6 नोव्हेबर ला नाशिक येथून आलेले पोलिस नीरीक्षक रविन्द्र मुक्ताराम शिंदे यांची चिमुर पोलिस स्टेशनचा ठानेदार पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी ठानेदार शिंदे यानी चिमुर परिसरातील माहिती अधिकार्यान्कड़ूँन जानूंन घेतली.
या पूर्वी नाशिक पोलिस स्टेशनला पोलिस नीरीक्षक रविन्द्र शिंदे कार्यभार सांभालत होते. या आधी त्यानी गोंदिया, गडचिरोली येथे सुधा शाषणाच्या निर्देशाची प्रभाविपने अंमलबजावणी केली. थानेदार रविन्द्र शिंदे हे चिमुर परिसरात नवीन असल्याने त्याना येथील भौगोलिक परिस्थिति, संवेदनशील गाव, लोकांची मानसिकता ओळखून कामें करताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे. नवीन थानेदार याणा अवैध व्यवसायीकांचे मोठे आवाहन असणार आहेत. ते कशाप्रकारे हातालतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here