राज्याच्या गृहमंत्र्यांची बदनामी करणार्‍यांना जनता माफ करणार नाही – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
491

राज्याच्या गृहमंत्र्यांची बदनामी करणार्‍यांना जनता माफ करणार नाही – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निराधार

हिंगणघाट २७ मार्च, अनंत वायसे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने भाजप व देवेंद्र फडणवीस यांचा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध करण्यात आला तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली.
महाराष्ट्रातील लोकशाही आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे तसेच सरकार विकास कामाला चालना देऊन आपली यशस्वी वाटचाल करीत आहे परंतु भाजपने तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे त्यांचे हे कृत्य अशोभनीय आहे भाजपने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्याच्या गृहमंत्र्यांना अनिल देशमुख तसेच महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे व बदनामी करणार्‍यांना जनता माफ करणार नाही असा इशारा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दिला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संयुक्त मोर्चाच्या भारत बंदला पाठिंबा दिला. केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतले. इंधन व गॅस सिलेंडरच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे याचा निषेध नोंदवला व केंद्र शासनाच्या धोरणाचा रोष व्यक्त करण्यात आला.
त्यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती संजय तपासे,रा.काँचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष भूषण पिसे, नगरसेवकतथा रा. काँचे गटनेता सौरभ तिमांडे, समुद्रपूर कार्यकारी अध्यक्ष पंकज बचाटे, प्रदीप डगवार,अशोक डगवार, दीपक पंढरे, युवा राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष गौरव घोडे, रा. काँ सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कांबळे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ साळवे, विपुल थुल,नाझिर अली,पदवीधर जिल्हा अध्यक्ष महेश बुरीले, शकील अहमद , कल्लू भाई, नितीन नवरखेडे, प्रवीण जनबंधू ,शरद कुलसंगे विजय बोरकर, गजानन सातपुते, तुकाराम डफ अनंता साबळे निखिल वडमअलवार, श्याम एडपवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विधानसभेचे अमोल त्रिपाठी ,राहुल कोळसे, युवराज माऊसकर ,रितू मोघे, गजू बेले, आशिष हरबुडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here