शाब्दिक चकमकीत प्रियकराचा प्रेयसी समोर गळफास
चिमूर येथील घटना, प्रेयसीचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न
आशिष गजभिये
चिमूर
एका प्रेमीयुगलांचे जोडपं एकांतात वेळ घालवण्यासाठी चिमूर – नेरी मार्गावर असलेल्या भूमी इम्पायर ले आऊट मध्ये गेलं होत.तिथे त्यांची शाब्दिक चकमक उडाली त्यात प्रियकराने प्रेयसी ची ओळनी घेऊन लगतच असलेल्या झाडाला गळफास घेत असल्याचे प्रेयसीला भासवले पण ओळणी गळ्यालां आवळली गेल्याने प्रेयसीने त्याचे पाय धरुन वाचण्याचा प्रयत्न केला पण ती त्यात निस्फळ ठरली व प्रियकराचा यात जीव गेला.
ही काळंजला भेडसावणारी घटना मंगळवार लां सायंकाळी 6.30 सुमारास चिमूर – नेरी रोडवरील भूमी एम्पायरच्या ले – आऊट मध्ये घडली. प्रीतम वाकडे (21) रा. पेंढकेपार ता.उमरेड जी.नागपूर असे मृतक युवकाचे नाव आहे. चिमूर पासून अठरा की.मी. अंतरावर असलेल्या एका गावातील युवती चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महविद्यालय येथे शिक्षण घेत आहे.
मंगळवार ला तिचा पेपर होता. त्या साठी तिचा मामेभाऊ असलेला प्रियकरां सोबत ती पेपर साठी आली होती.पेपर संपल्यावर त्यांनी एकांतात वेळ घालवण्यासाठी नेरी रोड वर असलेल्या भूमी एम्पायर ले आऊट मध्ये गेले. इथे त्या दोघात शाब्दिक चकमक उडाली. त्यात प्रियकराने प्रेयसीच्या ओलनी ने लगतच असलेल्या झाडाला गळफास लावला . फास गळ्याला घट्ट आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला.प्रेयसीने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यात ती अपयशी ठरली. त्या नंतर तिने सर्व प्रकार नातेवाईकाना कळवला. नातेवाईकानी पोलिसांना संपर्क केला.लगेल पोलीस निरीक्षक संतोष बाकल, सहायक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर,उपनिरीक्षक विलास निमगडे, यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृत्तकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात चिमूर पोलिसांची चमू करीत आहे.