ट्रॅव्हल्स झाडाला आदळून अपघातात चालक ठार, वऱ्हाडी जखमी
अपघाताचा पोलिसांना थांगपत्ता नाही..?
ट्रॅव्हल्स सुद्धा घटनास्थळा वरून गायब
खांबाडा येथील विवेकानंद शाळेजवळील घटना
विकास खोब्रागडे
पळसगाव (पि) नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथील विवेकानंद विद्यालयाच्या समोरील झाडाला चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक दिली.यात चालक गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मत्यु झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या अपघाताची माहिती पोलिसांना नाही तसेच घटनास्थळा वरून ट्रॅव्हल्स सुद्धा गायब करण्यात आली असल्याची माहिती प्रत्येक्षदर्शी गावकऱ्यांनी दिली आहे. सदर घटना १८ मे ला सकाळी १० वाजता दरम्यान घडली आहे.
सविस्तर असे की गोंदेडा येथील सुरेश श्रावण डांगे यांच्या मुलीचे लग्न वर्धा येथे आज दि १८ मे ला सायंकाळी होते त्या लग्नाला वऱ्हाडी घेऊन जाण्यासाठी उमरेड येथील साईराम टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स ची एम एच-०४ एफ के -४६४८ या क्रमांकाची गाडी केली होती सदर ट्रॅव्हल्स गोंदेडा येथून वरात घेऊन निघाली असता खांबाडा गावाजवळ विवेकानंद विद्यालयाच्या समोर चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने वाहनाणे झाडाला धडक दिली या धडकेत चालक राजू माधवराव वरघणे वय ६५ वर्षे याला गंभीर मार लागला तर काही वऱ्हाडी लोकांना किरकोळ मार लागल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे. ट्रॅव्हल्स चालकाला बाहेर काडून रुग्णालयात नेल्याची चर्चा असून कोणत्या रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले याची माहिती नसून काही नागरिक सदर चालक हा नेताना वाटेत मरण पावला असे बोलीत आहे. तर सायंकाळी सदर चालक मरण पावला असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.तसेच या अपघाताची माहिती पोलीस विभागाला सुद्धा देण्यात आली नव्हती मात्र सुगावा लागताच पोलीस घटनास्थळी जाऊन आले असल्याची माहिती आहे परंतु चालक कुठे आहे कुठल्या रुग्णालयात आहे याची माहिती पोलीस विभागाला सुद्धा नाहीं. तसेच घटनास्थळ वरून ट्रॅव्हल्स सुद्धा गायब करण्यात आली आहे सदर ट्रॅव्हल्स नेरी येथील शिंदेवाही रोडवरील वाघे यांच्या घरासमोर रस्त्यावर उभी करण्यात आली असून तिला समोरून ताळपत्रीने झाकले आहे.तेव्हा संबंधित अपघाताच्या संदर्भात चौकशी करून पोलीस विभागाने तपास करावा अशी मागणी होत आहे.