कपासी वरील गुलाबी बोंडअळी रोगामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी!

0
432

कपासी वरील गुलाबी बोंडअळी रोगामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी!

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने वर्धा जिल्हाप्रमुख जयंत तिजारे याच्या नेत्वृाखाली कृषी अधिक्षक वर्धा याना निवेदन देण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील कपासी वरील गुलाबी बोंडअळी रोगामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत जाहीर करा सपुंर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन च्या नापिकी मुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता कपासी वरील गुलाबी बोंडअळी च्या रोगाने हैराण केले आहे सततची नापकी कोरोणासारखी महामारी सोयाबीनने दिलेला धोखा त्यातच आता हातातुन आता कपासीचेहि पिक जाताना दिसत आहे कपासी वरील गुलाबी बोंडअळी मुळे तोंडी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावताना दिसत आहे त्यामुळे आपला शेतकरी हा संपुर्ण आर्थिक विवंचनेत सापडला असुन तो पुर्ण पणे मेटाकुटीला येऊन ठेपला तरी आपण त्वरीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन त्याची व्यथा समजुन घ्यावी व त्याच्या बोंडअळी मुळे नुकसान झालेल्या कपासी पिकाचे पंचनामे करून शासना कडे पाठपुरावा करून मदत जाहिर करावी अशा याचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी वर्धा जिल्हा प्रमुख जयंत तिजारे उपप्रमुख मंगल सोनटक्के,समुद्रपुर तालुका प्रमुख प्रमोद म्हैसकर, सेलु तालुका प्रमुख हसंराज बेलखोडे, विनोद खंडाळकर, सेलु तालुका उपप्रमुख नितेश भोमले, सिंधी रेल्वे शहर प्रमुख सुरज आष्टनकर, उपशहर सचिन पेटकर, प्रहार शेतकरी संघटना शहर प्रमुख नुतन बेलखोडे, शुभम सुरकार ,प्रहार विद्यार्थी संघटना शहर प्रमुख अभिषेक बडवाईक, शुभम गोल्हर,कुणाल सोनटक्के, अक्षय मुंजेवार, विनोद भोमले, आकाश कांबले ,प्रफुल गारगाटे, राकेश भोयर,सूरज काळे, अरविंद डुकरे, सूरज मडावी, सूरज घोडे उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here