जिद्द, चिकाटीने परिश्रम केल्यास यशप्राप्ती निश्चित – के.डी.मेश्राम

0
448

जिद्द, चिकाटीने परिश्रम केल्यास यशप्राप्ती निश्चित – के.डी.मेश्राम

यंग ब्रिगेड गोंडपिपरी द्वारा आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात तहसीलदारांचे प्रतिपादन

गोंडपिपरी : जिद्द,चिकाटीने परिश्रम घेतल्यास निश्चितच यशप्राप्ती होते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात बालपणापासूनच मेहनत घ्यावी सातत्यपूर्ण प्रयत्नातून भविष्यात यश गाठता येते. असे प्रतिपादन तहसीलदार के.डी मेश्राम यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील लाकडाऊन ज्ञानशाळेत यंग ब्रिगेड गोंडपिपरी द्वारा आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नुकतीच पार पडली. दि.३ मंगळवारी बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. कोरोनाच्या प्रारंभापासून सर्व शाळा बंद आहेत.आता ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाली. परंतु ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे ग्रामिण भागातील विध्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून वंचीत आहे. अशात गावातील विध्यार्थ्यांना न्याय देण्याचा दृष्टीने सुशिक्षित अनिकेत दुर्गे या युवकाने तळोधी गावात ज्ञानशाळा सुरू केली. नियमांचे पालन करून गावात शाळा बंदीतही विध्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध झाले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्मशान शांततेत चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला. पाहता पाहता भंगाराम तळोधीच्या ज्ञानशाळेचा आदर्श घेत जिल्यात १० च्या वर ज्ञान शाळा सूरु झाल्या. तळोधीच्या ज्ञानशाळेत ४० विध्यार्थी रोज शिक्षण घेत आहे.विध्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवले जातात त्याच अनुषणगाने सामान्य ज्ञान स्पर्धा राबवून रोख रक्कम विजेत्यांना यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार यांच्या तर्फे उपलब्ध करून देण्यात आली. बक्षीस वितरण कार्यक्रमाला तहसीलदार के.डी मेश्राम, गोंडपिपरी यंग ब्रिगेड चे कार्यध्यक्ष निकेश बोरकुटे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गौरव घुबडे, तालुका सचिव प्रमोद दुर्गे, पत्रकार समीर निंमगडे, नितेश डोंगरे, दीपक वांढरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here