खडसंगी – नवेगाव (गेट) मार्ग चौकाला जगनाडे महाराजांचे नाव द्या!
श्री संताजी अखिल तेली संघटनेची मागणी
तालुका प्रतिनिधी
चिमूर
तालुक्यातील खडसंगी येथील नवेगाव (गेट)मार्गावरील चौकाला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे, व पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्यात यावी अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत खडसंगी येथे करण्यात आली.
खडसंगी गावात तेली समजाची संख्या सर्वात मोठा समाज असून समाजातील महान संत श्री जगनाडे महाराज यांचे नाव गावातील नवेगाव(गेट) मार्गावरील चौकाला देण्यात यावे व त्याचे स्मारक त्या ठिकाणी निर्माण करावे अशी मागणी निवेदनातून ग्रामपंचायत प्रशासनाला करण्यात आली.
निवेदन देताना श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे अजय लाकडे,प्रमोद श्रीरामे,विनोद नागोसे ,मदन तराले आदीं समाज बांधवांनी सरपंच प्रियंका कोलते यांच्या कडे निवेदनातून मागणी केली आहे.