बिबट्या ची दहशत सलग तिसऱ्या दिवशी ही कायम
चामोर्शी तालुका प्रतिनिधी सुखसागर झाडे

घोट:- येथून 7किमी.अंतर असलेल्या ठाकूरनगर येथे सलग ३दिवशी बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. रविवारी बिबट्याने पुन्हा एकाच्या घरातील कोबंड्यावर मारला आहे. शुक्रवारी ठाकूरनगर येथील माया हलदार यांच्या वर बिबट्या ने हल्ला करून तिला ठार केले. त्यानंतर शनिवारी त्यांच्याच घरातील कोबंड्यावर हल्ला केला.
सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान गुंडापल्ली येथून बाजार करून शुशंकर मंडल व क्रिष्णा मंडल हे दुचाकीने येत असताना त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने पंजा मारला. घोट पासुन ३किमी. मार्ग ओलांडताना बाजारातून येनारया व्यापार यानी बिबट्याला पाहिले. रविवारी पहाटे बिरास शाना यांचे घरच्या कोबंड्यावर ताव मारला. दिज्ञेन गमसता यांच्या घरासमोर बसून दिसला. नागरिकांच्या जमावाने व फटक्यांच्या आतिषबाजी मुळे बिबट्याने पळ काढला. सदर त्या भागातील नागरिक भयभीत झाले असून नागरिकांच्या मागणीवरुन या भागात पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.