दाक्षिणात्य अभिनेता व अभिनेत्री ताडोबातील वाघांच्या भेटीला

0
1250

दाक्षिणात्य अभिनेता व अभिनेत्री ताडोबातील वाघांच्या भेटीला

चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वारातून केली सफारी

आशिष गजभिये.
चिमूर.

हमखास व्याघ्रदर्शनासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पात देशविदेशातील नामवंत व्यक्ती नेहमीच येत असतात.येथील वाघांनी अनेकांना भुरळ घातली आहे.दरम्यान रविवारी तामिळ चित्रपटसृष्टीतील युवा अभिनेता नागा चैत्यन व अभिनेत्री समानता प्रभू या दाम्पत्याने व्याघ्रदर्शनाचा आनंद घेतला. चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वारातून त्यांनी ताडोबाची सफारी केली.

चिमूर तालुक्यातील प्रवेशद्वारातून ताडोबाच्या सफारीला गेल्यावर हमखास वाघ दिसतोच,असा बहुतांश पर्यटकांचा अनुभव असून रविवारला सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागा चैत्यन व अभिनेत्री समानता प्रभू हे दाम्पत्य ताडोबा भ्रमंतीसाठी दाखल झाले होते. चिमूरजवळील बांबू रिसॉर्ट मध्ये आगमन झाल्यावर येथील व्यवस्थापणाने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ताडोबा व्याघ्रप्रकल्प वाघांसाठी जगप्रसिध्द असून या ठिकाणी नेहमी देश-विदेशातील पर्यटक,नेते -अभिनेते,क्रिकेटपटू, अभ्यासक सहकुटूंब व्याघ्रदर्शनासाठी येत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here