क्षुल्लक कारणावरून दोन ईसमात हाणामारी ; गुन्हा दाखल

0
402

क्षुल्लक कारणावरून दोन ईसमात हाणामारी ; गुन्हा दाखल

चिमूर । विकास खोब्रागडे

चीमुर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजा म्हसली येथील रहीवासी दोन ईसमात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याने दोघानंवरती नेरी पोलिसांनी कार्यवाही करुन गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर व्रुत्त याप्रमाणे आहे की मिलींद पाटील याने घरासमोरील विजय डोंगरवार यांच्या मुलाला आमच्या जागेवर बैल का बांधले म्हणून झगडा भांडण केले तसेच विजय डोंगरवार हा मिलींद पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन पत्नीच्या गालावर मारू का असे म्हणाला यावरून भांडन झाले व मिलिंद याने घरातून लोखंडी विळा आणून हमला केला तो हमला वाचवण्यासाठी विजय डोंगरवार यांनी आपला उजवा हात टाकल्याने उजव्या हाताच्या बोटावर दुखापत होवून जखम झाली यानंतर विजय डोंगरवार हा आपला मुलगा हरेशसह मिलींद पाटील च्या घरात शिरुन लाकडी दांड्याने डोक्यावर तसेच डाव्या हातावर वार करुन जखमी केले यातील जखमींनी एक मेकाच्या विरोधात चिमुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली असुन तक्रारी च्या अनुषंगाने कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भांदवी नुसार गुन्हा नोंद करण्यात येवून कार्यवाही करण्यात आली आहे सदर घटनेचा तपास ठाणेदार स्वप्नील धुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण मेश्राम , अमलदार कैलास आलाम, रोशन तामशेटवार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here