कोरोना जनजागृती काव्यधारा – ८
कवयित्री – शितल धर्मपुरीवार, चंद्रपूर

कविता : माझे कुटुंब,माझी जबाबदारी
माझे कुटुंब
माझा भारत देश
मी कर्मचारी
साधा माझा वेष..
आलो तुमच्या दारी
जाणून घेण्या आपले हालहवाल
बाकी काहीच नाही
तब्बेत ठिक आहे ना
एवढाच माझा सवाल….
कसे आहात
आहात ना स्वस्थ
घाबरु नका आम्ही आहोत
वाटले थोडे जरी अस्वस्थ…
मी देतो आहे
जनहितार्थ सहकार्य
तुम्हीही विरोध करु नका
हे तर खरे राष्ट्रकार्य…
आरोग्य संपन्न कुटुंब
आरोग्य संपन्न देश
या सर्वेक्षणाचा
प्रामाणिक उद्देश..
भाग जा कोरोना
अब हमारी बारी
जाणिव जागृत्ती आणि
थोडी घ्या खबरदारी
माझे कुटुंब,माझी जबाबदारी
माझे कुटुंब,माझी जबाबदारी…..
कवयित्री : शितल गिरीधर धर्मपुरीवार, चंद्रपूर
संपर्क : ८२७५५७१९७८
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)
•••••••