विविध क्षेत्रात लौकीक संपादन करणाऱ्या महिलांचा आदर्श बाळगा – हंसराज अहीर
गोंडपिपरी येथे महिला दिनी कर्तबगार महिलांचा सन्मान

गोंडपीपरि(सूरज माडूरवार)
राष्ट्राच्या निर्माण कार्यात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे योगदान असुन आज महिलांसाठी कोणतेही क्षेत्र अपवाद राहीलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण हे त्यांच्या कर्तबगारीचे फलित आहे. राजकारण, समाजकारण, संरक्षण, वैद्यकीय, पोलीस यासोबतच अन्य विविध क्षेत्रामध्ये महिलांची नेत्रदिपक कामगिरी बघतांना त्यांच्या कार्यकुशलतेचा अभिमान वाटतो त्यांच्या या कार्यातून युवापिढीने प्रेरणा घेवून लौकीक संपादन केल्यास जागतिक महिला दिन सार्थकी ठरेल अशा भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.
गोंडपिपरी येथे दि. 08 मार्च रोजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमास ते संबोधीत होते. समाजातील प्रत्येकांनी भगिनींचा सन्मान करून त्यांना पुरूषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहीजे तेव्हाच देशाची विविध क्षेत्रात झपाट्याने प्रगती होईल असेही त्यांनी सांगीतले.
यावेळी हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा स्मृतीचिन्ह व पुषगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमास राजु घरोटे, सौ.सुनिता भानेश येग्गेवार सभापती पं स गोंडपिपरी बबन निकोडे, मनीष वासमवार, चेतन गौर, वैष्णवी बोडलावार, स्वाती वडपल्लीवार, अरूणा जांभुळकर, पं समिती सदस्य कुसूमताई ढुमणे, भुमी पिपरे, श्री अश्विन कुसनाके, बंडु बोनगिरवार,नितीन ढुमणे यांचेसह मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.