घुग्घुस वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न

0
143

घुग्घुस वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न

 

घुग्घुस, 3 मार्च : वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून कुशाल मेश्राम महारष्ट्र सदस्य, प्राध्यापक सोमाजी गोंडणे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, कविताताई गौरकर जिल्हाध्यक्ष महिला, अँड. अक्षय लोहकरे जिल्हा महासाचिव, मधुकर उराडे जिल्हा महासचिव, नागेश पथाडे जिल्हा महासचिव, भगीरथ वाकडे निरिक्षक, धर्मेंद्र शेंडे तालुका अध्यक्ष, प्रज्ञाताई ठमके तालुका महासचिव, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचीत बहुजन आघाडी नवनियुक्त घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, यांच्या नेतृत्वात घुग्घुस शहर येथे भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह लुंबीनी नगर घुग्घुस येथे काल आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने यांच्या अध्यक्षतेखाली व घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वा मध्ये शेकडो महिला व पुरुष यांनी पक्ष प्रवेश केला. मा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने साहेब व अण्य जिल्हा पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश घेणाऱ्यास पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

रमाबाई सातारडे, माधुरीताई चन्नुरवार, नैनाताई कन्नाके, अश्विनीताई सातपुते, स्मिताताई कांबळे, जयोतीताई बेंडले, शोभाबाई भालशंकर, सविताताई मंडपे, वनिताताई निखाडे, यशोधरा धोटे, कुमुद निखाडे, रंजना राऊत, संगिताताई वासेकर, आम्रपालीताई करमनकर, विजय कवाडे, बबन वाघमारे, मिनाताई गुडदे, मंगेश रामटेके व समस्त पक्ष प्रवेश करणार्‍यास वंचित बहुजन आघाडी चा दुप्पटा व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने यांनी सर्वांना समोरील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे संचालन रिताताई देशकर तर आभार प्रदर्शन मायाताई सांड्रावार, केंद्रीय शिक्षिका यांनी करून व सर्व उपस्थितांना अल्पोपाहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळेस वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे महासचिव, अशोक भगत कोषाध्यक्ष, राकेश पराशिवे संघटक, आशिष परेकर आयटी सेल प्रमुख, विशाल भगत, नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here