कामगार नेते सय्यद अनवर यांनी केली वृद्ध महिलेची फसवणूक

0
220

कामगार नेते सय्यद अनवर यांनी केली वृद्ध महिलेची फसवणूक

 

घुग्घुस येथील काँग्रेस नेते तसेच कामगार नेते सय्यद अनवर यांनी एका वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.

यमुनाबाई देविदास गजभिये (रा. अमराई वार्ड, घुग्घुस) या वृद्ध महिलेचा मुलगा राजू देविदास गजभिये हा ताडाली येथे रेल्वे रेल्वेमध्ये कोळसा लेव्हलिंगचे काम करीत असतांना ताराला स्पर्श होऊन ३० ऑक्टोबर २०१० ला जळून मृत्यू झाला.

त्यावेळी तिथे नामदेव प्रधान, सुमित पाटील, सुधाकर वाघमारे तसेच काँग्रेसचे नेते सय्यद अनवर उपस्थित होते. उपस्थितांनी विनंती केली जो पर्यंत कुटुंबियांना कंपनीतर्फे आर्थिक मदत देण्यात येणार नाही तो पर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही.

त्यानंतर कंपनीतर्फे यमुनाबाई गजभिये यांना ३.५० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. त्यानंतर सय्यद अनवर यांनी कंपनीच्या कार्यालयात खर्च पाणी म्हणून १० हजारांची मागणी केली त्यामुळे यमुनाबाई गजभिये यांनी सय्यद अनवर यांना १० हजार रुपये दिले.

तीन दिवसानंतर काँग्रेस नेते सय्यद अनवर हे यमुनाबाई गजभिये यांच्या घरी गेले व माझ्या पत्नीची तब्बेत खराब आहे असे सांगितले व २५ हजारांची मागणी केली. तेव्हा यमुनाबाई गजभिये यांनी सांगितले माझ्याकडे २५ हजार रुपये नाही तेव्हा काँग्रेस नेते सय्यद अनवर म्हणाले १५ हजार रुपये तरी द्या अशी मागणी केली. तेव्हा यमुनाबाई गजभिये यांनी मी जास्तीत जास्त १२ हजार रुपये देऊ शकतो असे काँग्रेस नेते सय्यद अनवर यांना सांगितले यावर त्यांनी होकर दर्शवीला व पैसे १० दिवसात परत करतो असे सांगितले तेव्हा यमुनाबाई गजभिये यांनी काँग्रेस नेते सय्यद अनवर यांना १२ हजार रुपये दिले.

काही दिवसानंतर यमुनाबाई गजभिये ही पैसे परत मागण्यासाठी काँग्रेस नेते सय्यद अनवर यांच्या घरी गेली असता काँग्रेस नेते सय्यद अनवर यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले.

त्यानंतर यमुनाबाई गजभिये ही काँग्रेस नेते सय्यद अनवर यांच्या घरी महिन्याला सहा ते सात वेळा चकरा मारल्या परंतु त्यांनी यमुनाबाई गजभिये यांचा अपमान करून परत केले.

एक दिवस काँग्रेस नेते सय्यद अनवर आणि यमुनाबाई गजभिये यांची भेट झाली असता त्यांनी काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या कार्यालयात पैसे मिळणार असून तिथे जाण्यास सांगितले. त्यानंतर काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या कार्यालयात यमुनाबाई गजभिये गेल्या असता तिथे ही उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली.

शेवटी काँग्रेस नेत्याच्या त्रासाला कंटाळून यमुनाबाई गजभिये यांनी घुग्घुस पोलिस ठाणे गाठून याबाबतचा तक्रार अर्ज दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here