ग्रामगीता महाविदयालयात माजी विद्यार्थी मेळावा

0
259

ग्रामगीता महाविदयालयात माजी विद्यार्थी मेळावा


चिमूर/तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामगीता महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन मंगळवार ला करण्यात आले. या मेळाव्याला महाविद्यायाच्या कृज्ञतेसाठी व आपले महाविद्यालयीन अनुभव सद्याच्या विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दाखवली. कार्यक्रमा दरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव तसेच महाविद्यालयाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील माजी विद्यार्थी श्री. योगेश मेश्राम या विद्यार्थ्याचा उत्कृष्ट कार्यासाठी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अमीर धमानी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आई.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. निलेश ठवकर, प्रा. नागेश ढोरे, माजी विद्यार्थी श्री. सचिन भरडे आणि श्री. जयराम वावरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी महाविद्यालयात केलेल्या नवनवीन उपक्रमाबद्दल, विकास कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी विभाग समन्वयक प्रा. समीर भेलावे यांनी तर प्रास्ताविक प्रा. नागेश ढोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here