जवाहरनगर येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक

0
253

जवाहरनगर येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक

देवराव भोंगळे यांनी भेट देऊन मदतीची केली मागणी; दोन लाखापर्यंतचे झाले नुकसान

राजुरा : शहरातील जवाहर नगर वॉर्डात राहणाऱ्या संतोष पांडुरंग येरगुडे यांच्या घरी पहाटे तीन वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण स्वयांपक खोली जाळून खाक झाली असून यात स्वयंपाक खोलीतील सर्व जीवनावश्यक वस्तूंची राख झाली असून यामध्ये जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांना मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित विभागाला चौकशी करून मदत देण्याच्या सूचना केल्या आहे.

शहरातील मध्यभागी असलेल्या जवाहर नगर वार्डात संतोष येरगुडे हा आपल्या परिवारासह सासरे विठोबा डेरकर यांच्या घरी स्वतंत्र घरात राहत होता. नेहमी प्रमाणे रात्रोला जेवण करून कुटुंबातील सगळे लोक झोपी गेले. पहाटे तीन वाजता सुमारास स्वयंपाक खोलीतील इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने व छत कवेलू व लाकडाचे असल्याने काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले होते. साखर झोपेची वेळ असल्याने दुसऱ्या खोलीत झोपून असलेल्यांना प्रकाश व गरम हवा जाणवू लागले तेव्हा पाहते तर स्वयंपाक खोलीला संपूर्ण आगीने वेढले होते. आजुबाजूच्या घरच्यांना आवाज देऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत स्वयंपाक खोलीतील साधन सामुग्रीची राख झाली होती. यात प्रिज, वर्षभर लागणारे गहू, तांदूळ, किराणा साहित्य, इलेक्ट्रिक वस्तू, दैनंदिन वापरातील वस्तू , छत यासह अन्य साहित्याचा समावेश असून एकूण दोन लाख रुपये किमतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

या घटनेची माहिती भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता. यात येरगुडे परिवाराचे मोठे नुकसान झाले असून विद्युत विभागांनी घटनास्थळी येऊन मोक्का पंचनामा करून पिढीतांना मदत करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रकाश येरगुडे, सुमन डेरकर, त्यांची पत्नी, गणेश चोथले, अरुण डेरकर, विनायक देशमुख, सुरेश रागीट यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here