नांदाफाटा-आवाळपुर मार्गावरील ट्रकांची अवैध पार्किंग धोकादायक

0
739

नांदाफाटा-आवाळपुर मार्गावरील ट्रकांची अवैध पार्किंग धोकादायक

उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करू

उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांची मागणी

रस्त्याकडेला अशाप्रकारे दोन्ही बाजूस अवैध पार्किंग मुळे अपघात होत आहेत

नितेश शेंडे, नांदाफाटा (कोरपना) : औद्योगिक नागरी असलेल्या गडचांदूर-नांदाफाटा – आवाळपुर हा मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात. यामुळे वळण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना समोरील वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहेत. नांदाफाटा आवाळपुर परिसरात दोन मोठे सिमेंट उद्योग, एक कोळसा खदान आहे. गडचांदूरवरून अल्ट्राटेक, दालमिया सिमेंट प्लांट व वेकोली मध्ये जाण्यासाठी गडचांदूर- नांदाफाटा या मार्गाचा वापर सर्व ट्रक चालक करतात. नांदाफाटा बाजारपेठ ही सर्वांसाठी केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. मात्र, याच रहदारीच्या रस्त्यावर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतुन सिमेंट वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभे करून वाहन चालक आपल्या घरी जात असतात. यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून, अनेकदा छोट्या मोठया अपघातांच्या घटना घडल्या आहेत. ट्रक चालकांची मुजोरी एवढी वाढली की, ते चक्क नागरिकांच्या घरासमोर वाहन उभे करून ठेवत आहेत. पोलीस प्रशासनाचे वाहन नियमित या ठिकाणी येत असतात. तरी अवैध ट्रक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे. नांदाफाटा परिसरात मोठ्याप्रमाणावर अवैध जड वाहतूक होत असताना येथे एकही वाहतूक शिपाई नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध पार्किंग वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली असून लवकर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आवाळपुर ग्रामपंचायत चे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी दिला आहे.

बाळकृष्ण काकडे, उपसरपंच ग्रामपंचायत आवाळपुर

नांदाफाटा-आवाळपुर परिसरात मोठ्याप्रमाणात जड वाहतूक होत असून सायंकाळच्या वेळेस या परिसरात मोठी गर्दी असते. एकही वाहतूक पोलीस नसल्याने येथील वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. लोकांच्या समस्यांना न्याय मिळत नसल्यास आंदोलन करू.
बाळकृष्ण काकडे उपसरपंच ग्रामपंचायत, आवाळपुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here