सिध्दबली कंपनीतील अपघात स्थळी आ. किशोर जोरगेवार यांची भेट!

0
513

सिध्दबली कंपनीतील अपघात स्थळी आ. किशोर जोरगेवार यांची भेट!

दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याच्या दिल्या सुचना!

चंद्रपूर । किरण घाटे

कर्तव्यावर असतांना अपघात झाल्याने एका कामगाराचा मृत्यू तर दोन कामगार जखमी झाल्याची घटना काल सोमवारी एमआयडीसी परिसरातील सिध्दबली स्टिल कंपणीत घडली होती. आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी पडोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार मुर्लीधर कासार यांचीही उपस्थिती होती. यावेळी कामगारांकडे सुरक्षा साधणे नसल्याने सदर दूर्घटना घडल्याचे लक्षात येताच प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत दोषी अधिका-यांवर कार्यवाही करण्याचे निर्देष यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
सिध्दबली कंपनीतील डिंगणारु ईसलरी, क्रीष्णा, श्री क्रीष्णा हे तिन कंत्राटी कामगार काल सोमवारी नेहमी प्रमाणे कर्तव्यावर गेलेत यावेळी वरील शेडचे काम करत असतांना सदर कामगार खाली कोसळले यात तिनही कामगार गंभीर जखमी झालेत यातील डिंगणारु ईसलरी या कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दोन कामगारांवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कंपणीला भेट देत घटणास्थळाची पाहणी यावेळी सदर कंपनीचे अधिकारी अभय सिंह, परमार यांच्यासह इत्तर कामगारांची उपस्थिती होती. पाहणी दरम्यान अनेक .त्रृट्या लक्षात आल्यात येथील कामगारांकडे सुरक्षा साधने नसल्याचेही यावेळी लक्षात आले. घटनेच्या दिवशी कामगार कोणत्याही सुरक्षा सेफ्टी शिवाय काम करत होते. त्यातून हि दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनेच्या दिवशीची पूर्ण माहिती जाणून घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कंपणीच्या दोषी अधिका-यांवर कार्यवाही करण्याचे निर्देष पोलिस प्रशासनाला दिले असून पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांच्याशीही दुरध्वनीवरुन संपर्क साधन सदर घटणेविषयी महत्वाच्या सुचना केल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, राशीद हुसैन यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडचे रुपेश झाडे, विजय बलकी, राकेश पिंपळकर, ऍड. राम मेंढे, विजय सोनटक्के, विनोद सोपानकर, विलास सोमलवार, अमोल झाडे, तुळशीराम देरकर, गणेश मोरे, परसराम निखाडे, रवी मंगर, भाऊराव निखाडे आदिंची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here