आेबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करा! नागपूरातील महिलांची निवेदनातून मागणी!

0
482

आेबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करा! नागपूरातील महिलांची निवेदनातून मागणी!

किरण घाटे

नागपूर । आेबीसीची जाती निहाय जनगणना करा या प्रमुख मागणीचे एक लेखी निवेदन नुकतेच उपराजधानी नागपूरातील काही महिलांनी उपजिल्हाधिकारी (नागपूर) यांना सादर करुन त्यांनी या मागणी संदर्भात चर्चा केली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी, नागपूर विभाग यांच्या वतीने सदरहु निवेदन सादर करण्यांत आले. निवेदनात ओबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करण्यात यावी ही मागणी प्रामुख्याने नमुद करण्यांत आली. निवेदन सादर करतांना नागपूर महापालिकेच्या भूतपूर्व नगर सेविका नयना संजय झाडे, मीनाताई लेंडे, मनीषा झाडे, सुवर्णा बालपांडे, धनश्रीताई चुलबुले, मेहर आदि महिला उपस्थित होत्या. दरम्यान नागपूर जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटनांनी या संदर्भात निवेदने सादर केल्याचे व्रूत्त आहे.चंद्रपूर जिल्ह्यात देखिल याच मागणी संदर्भात निवेदने देण्यांत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here