हनुमान जन्मोत्सव निमित्त शहर काँग्रेस तर्फे दही सरबत वितरण

0
578

हनुमान जन्मोत्सव निमित्त शहर काँग्रेस तर्फे दही सरबत वितरण


घुग्घुस : पवनसुत संकटमोचन भगवान शिव यांचे रुद्रावतार कलयुगातील देवता व लवकर प्रसन्न होणारे बजरंग बली यांचा जन्मोत्सव घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक बस स्थानक परिसर याठिकाणी दही सरबत वितरीत करीत उत्साहात पार पडला. बस स्थानक परिसरातील शेकडो नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी सरबतचा आस्वाद घेतला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, किशोर बोबडे, सुधाकर बांदूरकर, अलीम शेख, रोशन दंतलवार, रोहित डाकूर, नुरुल सिद्दिकी, विशाल मादर, तिरुपती महाकाली, शेख शमीउद्दीन, श्रीनिवास गुडला, विजय माटला, शहजाद शेख, कुमार रुद्रारप, देव भंडारी, रफिक शेख, सुनील पाटील, अरविंद चहांदे, अमित सावरकर, सुमेश रंगारी, अंकुश सपाटे, कपिल गोगला, रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here