गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाला वस्तू व सेवा कर

0
320

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाला वस्तू व सेवा कर
विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आदेश वापस घेण्याची वंचित युवा आघाडीची मागणी
निर्णय वापस न घेतल्यास विद्यापीठा समोर आंदोलन करणार…

चंद्रपूर : गडचिरोली सारख्या मागास आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. परंतु विद्यापीठांच्या वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढले. त्यात सर्व संलग्नित महाविद्यालयाला संलग्निकरण शुल्कासह विविध शुल्क भरताना 18% वस्तू व सेवा कर भरावा लागणार आहे, असे आदेश देण्यात आले.
देशातील करप्रणाली मध्ये सुधारणा करताना सरकारने नवी कर प्रणाली वस्तू व सेवा कर जीएसटी लागू केली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रालयाने शिक्षण क्षेत्राचा यात समावेश करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र गोंडवाना विद्यापीठाने सलग्नित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना 18% वस्तू व सेवा कर भरावाच लागणार असे परिपत्रक काढून विद्यार्थ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण देखील आता जीएसटी च्या कक्षेत आल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांना सुद्धा यापुढे परीक्षेसह विविध शुल्क भरताना वस्तू व सेवा कर द्यावा लागणार आहे. या कराचा भुर्दंड विद्यार्थ्याना बसणार आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्‍या या तुघलकी आदेशांचा वंचित बहुजन युवा आघाडी निषेध करत हा निर्णय त्वरित वापस घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी विद्यापीठा समोर आंदोलन करणार असा इशारा वंचितचे सिद्धांत पुणेकर यांनी दिला आहे. यावेळेस कबीर घोनमोडे, प्रणित तोडे, हर्षवर्धन कोठारकर, अक्षय लोहकरे आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here