पुरोगामी विचार मंच राजुरा द्वारा येत्या २५ मार्चला व्याख्यानपर्वाचे आयोजन

0
617

पुरोगामी विचार मंच राजुरा द्वारा येत्या २५ मार्चला व्याख्यानपर्वाचे आयोजन


राजुरा, २३ मार्च : शिवराय-फुले-शाहू-आंबेडर यांच्या विचारांची प्रासंगीकता या विषयावर व्याख्यानपर्वाचे आयोजन दिनांक 25 मार्च 2023 रोज शनिवार ला धनोजे कुणबी सभागृह, राजुरा येथे सकाळी 11: 30 वाजता पुरोगामी विचार मंच, राजुरा द्वारा करण्यात आले आहे.

सदर व्याख्यानपर्वाचे प्रमुख मार्गदर्शक दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक मा. प्रा. प्रल्हाद लुलेकर, औरंगाबाद हे आहेत.

सदर व्याख्यानमालेत सहभागी संघटना मराठा सेवा संघ, नागवंश युथ फोर्स, भारतीय बौद्ध महासभा आणि महात्मा ज्योतिबा फुले (माळी) समाज सुधारक मंडळ, राजुरा असून या व्याख्यानपर्वाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here