नांदा येथील ई-श्रम कार्ड शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

117

नांदा येथील ई-श्रम कार्ड शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद


नांदा :- मौजा नांदा फाटा येथे श्री शिवाजी इंग्लिश हायस्कूलमध्ये मोफत ई-श्रम कार्ड शिबीर ”निलेशभाऊ ताजने मित्रपरिवार नांदा-बिबी” यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 300 नागरिकांनी नोंदणीकरण करून मोफत सेवेचा लाभ घेतला. ई-श्रम कार्ड नोंदणी केल्यास आपल्याला केंद्र सरकारकडुन (2 लाख) रूपयाचा विमा मोफत मिळतो. श्रमिकांचा अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयापर्यंतचा विमा प्राप्त करू शकतो. शासनाच्या सरकारी योजनांचा सर्वात आधी ई-श्रम धारकांना लाभ घेता येईल तथा ई-श्रम कार्ड प्राप्त करून आपण सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेऊन, कामगारांच्या कार्य शक्तिच्या आधारे त्यांना रोजगाराच्या अधिक संधी शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातात. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासभुमीख नेतृत्त्वात केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना याच्या पुढेही जनतेच्या सेवेसाठी राबविल्या जातील असे आशवासित भारतीय जनता पार्टी युवा नेते निलेशभाऊ ताजने यांनी प्रतिपादन केले. या समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मुसळे माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना कोरपना, उद्घाटक पुरुषोत्तम आस्वले उपसरपंच नांदा, प्रमुख पाहुणे मेघा पेंदोर सरपंच नांदा, रत्नाकर चटप, युवा नेते निलेशभाऊ ताजने, लहुजी गोंडे,लीलाबाई चंद्रगिरी,दुर्गाताई पेंदोर,रवी बंडीवार,आकाश बोनगिनवार,रवी वर्मा आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

advt