अजय दुर्गे यांना समाजभूषण पुरस्कार

0
627

अजय दुर्गे यांना समाजभूषण पुरस्कार


शहरात, जिल्ह्यात रोजघडीला प्रत्येकाला आवर्जून एका फोन वर मदतीला धावणारे, चंद्रपूर जिल्ह्यातील उच्चशिक्षित युवा सामाजिक कार्यकर्ता, अजय सुनीता लहानुजी दुर्गे ( अलद.), यांच्या विद्यार्थी समस्या, सामाजिक समस्या आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्र चंद्रपूर यांच्या तर्फे गौरविण्यात आले.

अजय दुर्गे यांनी वेळोवेळी केलेल्या सदकार्याची चर्चा नेहमीच होत असते, आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आज समाजभूषण पुरस्कार मिळाला प्रदान करण्यात आला.

अपरिचित गोर, गरिबांसाठी, गरजुसाठी वेळात वेळ काढून नेहमीच मोफत रक्त, मोफत रुग्णवाहिका, हॉस्पिटलमध्ये उपचार त्वरित मिळवून देणे, अनेकांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत मिळवून देणे असे अनेक कार्यात अजय दुर्गे यांचा मोलाचा वाटा असतो. अजय दुर्गे यांना मिळालेल्या समाजभूषण पुरस्काराने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here