यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस तर्फे आमची विज आमचा अधिकार रॅली नागपूर विधानभवनावर रवाना

0
473

यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस तर्फे आमची विज आमचा अधिकार रॅली नागपूर विधानभवनावर रवाना

घुग्घुस दि.२६ डिसेंबर सोमवार सकाळ रोजी यंग चांदा ब्रिगेड कार्यालय घुग्घुस येथुन दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली.यंग चांदा ब्रिगेड संस्थापक तसेच अपक्ष आमदार मा.किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो घुग्घुस येथील नागरिक, कार्यकर्ते,महिलासह,चंद्रपूर येथून ऐतिहासिक रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद तसेच चंद्रपूरसह राज्यातील सर्व (थर्मल पावर) वीज उत्पादित जिल्हांना घरघुती वापराची २०० युनिट वीज व रोजगार निर्मितीकरिता उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्याच्या मागणीला घेवुन नागपूर विधानावर अधिकार रॅली काढण्यात आली.

यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस संघटक विलास वनकर, नेते इमरान खान, स्वप्नील वाढई, सुचित सोदारी बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उषाताई आगदारी, आदिवासी महिला आघाडी सौ.उज्वला उईके,तुलसी वृंदावन समाजाचे अध्यक्ष महेंद्र बाग व कार्यकारिणी चंद्रपूर जिल्ह्याचे शेकडो नागरिक प्रतिसाद देत रॅलीत सहभाग घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here